पोस्ट्स

गोर बंजारा संस्कृती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

इमेज
  गोर बंजारा समाज.. गोत्र विचार     मानवी समुहात कुटूंब पद्धती जशी विकसित होवू लागली. त्याप्रमाणे समुहाची एकवाक्यता व एकजिनसीपणा टिकवून ठेवण्यासाठी गोत्र संकल्पना रूढ झाली. मानवी समाजाच्या विकासाप्रमाणे गोत्र संघटना उदयास आली. कुटुंब संघटना उदयास आली तेव्हा पुर्णतः मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. गोत्रे ही मातृवंशीय होती.नंतरच्या काळात पितृसत्ताक कुटुंबपद्धती विकसित झाली आणि पितृवंशिय गोत्रे अस्तित्वात आली. असे माॅर्गन या समाजशास्त्रीचे मत आहे.            गोत्र आणि गोत्र प्रतीक (Totem) यांचा अभ्यास करणारे असेही म्हणतात की, ‘ मूळपूर्वज काल्पनिक वा सत्य असू शकतो. एवढेच नव्हे तर मूळ पूर्वज मनुष्यच असावयास पाहिजे असेही नाही. निर्जीव पदार्थ, कोणताही प्राणी, वनस्पती देखील मूळपूर्वजपदी स्थापता येऊ शकते.’         गोर बंजारा समाज गोत्र या शब्दाचा पर्यायी शब्द " गोत " . गोत्राच्या वेगवेगळ्या भाग पडतात त्यांना " पाडा " असे म्हणतात. एका गोत्रातील सर्व लोक एकमेकांना " गोत भाई " संबोधतात. तर ईतर गोत्रातील लोकांना " सगासेण " म्हणून सं...

गोर बंजारा समाज उत्पत्ती आणि इतिहास :- १ Gor Banjara Origin & History

इमेज
गोर बंजारा उत्पत्ती व मुळ गोर बंजारा समाजाच्या उत्पत्तीविषयी अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे मत मांडले आहेत. तत्पूर्वी मानव व मानवी समाज यांच्या उत्क्रांती विषयी थोडक्यात जाणून घेवूया.       विविध वैज्ञानिकांनी मानवी प्रजातीच्या उत्पत्ती विषयी वेगवेगळ्या प्रकारचे मत नोंदविले आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवी प्रजातीच्या विकासाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मानव उत्क्रांत होत गेला. कळप करून राहणे व जंगलातील विविध वनस्पती, फळ, फुले यावर आपली उपजीविका भागविणे हा नित्यक्रम. कालानुक्रमे आगीचा शोध, विविध हत्यारे यांच्या माध्यमातून उपजीविकेचे नवीन साधन शोधण्याचा प्रयत्न सतत करत गेला. पशु पक्षी पालन करणे, व त्यांच्या दुध, मांस यावर आपल्या समुहाची भुक भागविण्याची नवीन पद्धती उपलब्ध झाली. ऋतूमानानुसार आपली जनावरे घेऊन विविध भागांमध्ये भटकंती करत जीवन जगणे हाच एकमेव उद्देश होता.      विविध साहित्यामध्ये गोर बंजारा     राहूल सांकृत्ययान यांच्या " वोल्गा से गंगा " यामध्ये जनावरे घेऊन भटकंती करणाऱ्या मानवी समुहाचे वर्णन आलेले आहे. वेदांमध्ये जनावर...