गोर बंजारा इतिहास - साहित्य आणि संदर्भ ग्रंथ Gor Banjara History & Refferance Book

गोर बंजारा इतिहास साहित्य- संदर्भ 

  गोर बंजारा समाजाच्या उत्पत्ती, विकास आणि रुढी परंपरा याबाबत जाणून घेण्यासाठी सद्यस्थितीत अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. विविध साहित्याचा अभ्यास करून विविध लेखकांनी लिहिलेल्या या पुस्तकात गोर बंजारा समाजाचा प्राचीन इतिहास वाचायला मिळतो. गोर समाजातील रुढी, प्रथा, परंपरा, विविध सण, उत्सव, नीतीनियम याबाबत सखोल व सविस्तर अभ्यास करता येतो. 


गोर बंजारा लेखकांनी लिहिलेले साहित्य

१. गोर बंजारा लोगोका इतिहास... बळीराम पाटील

२. गोर बंजारा इतिहास व लोकजीवन.. आत्माराम कनिराम राठोड

३. गोर बंजारा वंशाचा इतिहास.. मोतिराज राठोड

४. बनजारा समाज.. श्रीराम शर्मा

५. बंजारा जाती समाज और संस्कृति.. यशवंत जाधव

६. बंजारा समाज.. डॉ. सुभाष राठोड

७. गोरबंजारा संस्कृती आणि संकेत.. भिमणीपुत्र मोहन नायक

८. बंजारा समाज लोकजीवन पद्धती.... डॉ. रुख्मिणी पवार

९. आपण कुणं..... काशिनाथ नायक

१०. स्वर्णिम बंजारा इतिहास.. डॉ. अशोक पवार.... 

११. बंजारा परंपरा आणि भोगवटा.. डॉ. विजय जाधव 

१२. राजबंजारा.. डॉ. राजकुमार राठोड

१३. गोरवट... आत्माराम कनिराम राठोड

१४. बंजारा लोकगीतोका सांस्कृतिक अध्ययन.. डॉ. गणपत राठोड

१५. बंजारा भाषा अपने आप सिखे.. डॉ. रमेश आर्या

१६.


    वरील काही मोजके लेखक व साहित्य यांची नावे दिली आहेत. यासारख्या अनेक मान्यवर लेखकांनी गोर बंजारा समाजाच्या इतिहासाची पाने वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. गोर बंजारा समाजाची जडणघडण, त्यामध्ये आलेले चढउतार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वीरांची कामगिरी. समाजमान्य रुढी, परंपरा आणि प्रथा यांचे महत्त्व विशद केले आहे. 

संदर्भ ग्रंथ....

    गोरबंजारा सहाजाचा इतिहास संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून वाचायचे असेल तर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. अशा ग्रंथातून अनेक उपयुक्त माहिती उपलब्ध होत आहे. पुढील काळात नवनवीन माहितीत अजून भर पडेल हे निश्चित.....

१ The Banjara... S.G. Devgaonkar

२. Indus civilization, Rigveda and Hindu culture.. 

     P. R. Deshmukh 

३. वोल्गा ते गंगा... राहुल सांकृत्ययान

४. Mysore cast and tribe volume ll

५. Gipsies.. Forgotten children of India.. Chamanlal.

६.  The tribes and caste of the central province of India... R. V. Russel and Hiralal 

७. जातक कथा.. भाग..१, २, ३.

८. गौरीशंकर ओझा.. निबंध संग्रह

९. सार्थवाह...मोतीचंद्र

१०.

     यासारख्या अनेक ग्रंथातून गोर बंजारा समाजाच्या इतिहासाची साक्ष मिळते. मुघल व ब्रिटिश काळातील असंख्य नोंदीत गोर बंजारा समाजाच्या कार्याची दखल घेतली आहे. तत्संबंधी पुरावे आजही उपलब्ध आहेत. मालाची ने-आण आण करण्याकरिता व लहान मोठ्या व्यापारासाठी हा समाज प्रसिद्ध होता.  ब्रिटिश काळात रेल्वेसारखी दळणवळणाची नवनवीन साधने निर्माण झाल्याने हा समाज ठिकठिकाणी स्थिरावला आहे. आपल्या जुन्या आठवणी काळजात साठवून जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार होत आहे. प्राचीन इतिहासाला जपत आधुनिकतेची कास धरत हळूहळू प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

किशोर आत्माराम नायक

गोर बंजारा संस्कृती 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess