गोर बंजारा समाज उत्पत्ती व ओळख..३ Gor Banjara's origin & Identity

गोर बंजारा गणाला जगात असलेली विविध नावे


   जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या अनेक समाजपैकी " गोर बंजारा" हा एक समाजगण. सिंधू संस्कृतीच्या काळापासून त्याच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळून येतात. बैलाच्या पाठीवर मालाची ने-आण करणाऱ्या या समुहाबाबत अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून ओळख करून दिली आहे. स्वतःला " गोर" " गोरमाटी" म्हणून ओळख देणारा हा समाज जगात विविध नावांनी ओळखला जातो. 
        प्राचीन काळी ज्या मार्गावरून गोर बंजारा समाज मालाची वाहतूक करत होता तो मार्ग आजही " लमाण मार्ग" म्हणून ओळखला जातो. या लोकांच्या सर्वप्रथम उल्‍लेखाविषयी ‘सर एच.एम. इलियट यांच्या मते , अकराव्या किंवा बाराव्या शकात झालेल्या ‘दशकुमार चरित्रम्’ या संस्कृत पुस्तकात बंजार्‍याचे नाव असल्यामुळे ही जात फार जुनी असावी. ख्रिस्ताब्दापूर्वीच्या चतुर्थ शतकात एका भटक्या जातीचा उल्‍लेख केला गेला आहे. हे तंबुत राहत व आपली जनावरे ओझ्यासाठी भाड्यानेही लावीत.
          आपली स्वतःची सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक मुल्य जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. गोर बंजारा समाजाच्या राहणीमान, वेशभूषा, व्यवसाय यावरून प्रगत समाजाने आपापल्या परीने त्यांना नावे दिलेली आहेत. संपूर्ण भारतातच नव्हे तर साऱ्या जगात हा समाज विखुरलेला आहे. मालाची वाहतूक हा व्यवसाय बंद पडल्यानंतर  हा समाज स्थायी जीवन जगू लागला. गाव नगरापासून अंतर ठेवून आपला " तांडा" जिवंत ठेवला.


          आत्माराम कनिराम राठोड, बळीराम पाटील, मोतिराज राठोड यासारख्या अनेक गोर विचारवंतांनी आपल्या साहित्यातून जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या या समाजाची ओळख जगासमोर आणली. ‌जगात गोर समाज जवळपास ५० तीस वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातो.
          
    १. बंजारा २. बनजारा ३.मथुरिया ४. बनजारे 
    ५. बनजारी ६. ब्रिजारी ७. ब्रजवासी ८. लमाना (लमाण)
     ९. लमाणी १०. लम्बाडा ११. लम्बाडी १२. लबान व लबाना 
     १३. लभान १४. लभानी १५. लभाना व लोभाना 
     १६. बाळदीया १७. लदेणीया १८. सुगाली 
     १९.गवार व गुरीया २०.ढालिया २१. गवारीया व गामवळीया
      २२. लदेणिया, २३. कांगसीया २४. फन्नाडा २५.
       शिरकीबाड २६. शिरकीवाला २७. सिंगाडीया  
       २८. ढाडी २९.भाट ३०. बामणिया, ३१.गुर्की 
       ३२.रोमा बंजारा, ३३.मारु बंजारा,३४.संभडिया
       ३५. पताडी, ३६.रोहिदास, ३७.नाई, ३८.सनार, 
       ३९.जांगड, ४०.अठरादेसिया, ४१.ओसरिया
       ४२.जाट बंजारा, ४३.धनकुटे बंजारा, ४४.कापडी बंजारा,
        ४५गुजरिया ४६. घुगरिया,४७ चांदेसिया,४८चारण बंजारा,
        ४९. नौदेसिया, ५०. बाळदीया 


      प्राचीन  उपजिविकेचे एकमेव साधन केवळ मालाची ने-आण करणे हे होते. गायी गुरांच्या पाठीवरून मालाची ने आण करणार्‍या या अवस्थेला ते ‘लदेणी’ असे म्हणत. अशी लदेणी म्हणजे व्यापार नव्हे. ती मालाची ने आण होय. त्यातून एखाद दुसर्‍या व्यक्‍ती विशेषाने जर पुढेमागे प्रत्यक्ष व्यापार केलाच असेल तर, केवळ त्यामुळे संपूर्ण जमातीला वाणिज्यवृत्तीवाचक संज्ञा देणे अयोग्य होय.
       विज्ञानाच्या युगात नवनवीन वाहतूकीची साधने निर्माण झाली. आणि गोर बंजारा समाजाचा वाहतूकीचा व्यवसाय बंद झाला.
       उपजीविकेचे साधन नसल्याने ज्या भागात वास्तव्य करणे सोपे गेले तेथेच हा समाज स्थायिक झाला. प्रस्थापित समाजाने आपापल्या परीने त्यांचे नामकरण केले. त्याची तशीच ओळख निर्माण झाली. असंख्य जरी नावे असली तरीही आपल्या सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीमुळे गोर बंजारा समाज आजही एकसंध, एकजूट होऊ शकतो.

Photo credit by . Goarbanjara.com

  किशोर आत्माराम नायक
  गोर बंजारा संस्कृती 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता.. १ Gor Banjara God & Goddess

गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..‌‌२ Gor Banjara Gotra, Got (pada)

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

गोर बंजारा समाज आणि देवीदेवता ...२ Gor Banjara God & Goddess