गोर बंजारा समाज गोत्र.. गोत (पाडा)..२ Gor Banjara Gotra, Got (pada)
गोर बंजारा गोत्र.. गोत (पाडा)
गोर बंजारा गणातील मुख्य असलेल्या भुकीया (राठोड), झरपला (पवार) , पालतिया (चव्हाण) , वडतिया (जाधव) , बाणोत (आडे) , तुरी(तंवार ) या गोत्राचे उपगट पडतात. त्याला गोरबोलीत " पाडा" असे म्हणतात. पाडे जरी वेगवेगळे असले तरी सामान्यतः त्यांची ओळख हि मुख्य गोत्रावरूनच होत असते. कोणत्याही उपगटात कोणतीही घटना घटित झाली तरी ती मुख्य गोत्रालाच बाधीत झाली असे मानले जाते.
१) भुकीया.. (राठोड)
जोतपूरच्या देमा गरुच्या वंशवेलीवरून भुकीया ( राठोड) चे एकूण सत्तावीस उपगट पडतात. यापैकी सेवासात चे चौदा (१४) व गोलावत चे तेरा (१३) मानले जाते. तर काही भागात मेनसीचे चार( ४ )मेलसीचे दहा (१०) मेघाचे सहा (६) आणि खमदरचे सात (७) == असे एकुण भुकीयाचे सत्तावीस (२७) पाडे मानतात.
सेवासात जंगी. गोलावत भंगी
१ खोला. ्् १. धेगावत
२. खाटरोत २. खेतावत
३. रातळा ३. कडावत
४. मोदरचा. ४. रामावत
५. दामणीया ५. राजावत
६. जिंदावत ६. देवसोत
७. हारावत ७. करमटोट
८. दालवाण. ८. पातळोत
९. सदारात ९. नेणावत
१०. धानावत १०. रणसोत
११. आनावत ११. उदावत
१२. माळणोत. १२. मेघावत
१३. हापावत १३. सांगावत
१४. लकसोत
२) झरपला.. (पवार)
धारानगरीच्या झरपला (पवार ) कुळाचे १२ बारा पाडे मानले जातात. जुन्या जाणकार मंडळींच्या मते धारानगरीचा राजा भोज हा झरपला गोत्रातील असल्याचे सांगितले जाते. राजा भोज यांचे नाव गोर बंजारा समाजाच्या अनेक गीत, कवनामध्ये ऐकायला मिळते.
१.ऐता
२. चैता, चावजड
३. लोका, लोकावत
४ बाणी, वाणी
५. तरभाणी, तरबाणी
६. मुंजवाणी
७. इसळावत, विसळावत
८. आमगोत
९. झरपला
१०. वाकडोत
११. नुणसावत ,लुणसावत
१२. इंजरावत, विजंरावत
३) पालतिया.. (चव्हाण)
चक्रिगढाचे पालतिया (चव्हाण) गोत्रात एकूण सहा ६ पाडे येतात. काही साहित्यिक पृथ्वीराज चौहान यांना पालतिया गोत्रातील असल्याचे सांगतात. राजा भोज प्रमाणे पृथ्वीराज चौहान यांचे नाव कोणत्याही प्रकारच्या साहित्यात येत नाही. परंतु त्यांच्या समकालीन देसराज, बसराज, आला - उद्दीन यांची नावे गोरबोलीतील अनेक लोककथा, बोली गीतातून येतात.
१. कुर्रा ,करा
२.सपावट
३.केळूत
४. मुड
५. लावडीया
६. पालतीया
४) वडतिया.. (जाधव)
बुंदेलखंड चे वडतीया (जाधव) या गोत्राचे एकूण ५२ पाडे येतात. वडतिया गोत्राविषयी लोकवंदता अशी आहे की एका गोरामाकडे झरपला कुळाचे काही रक्कम घेणे होते. त्याकरिता गोराम ने " गुजरी " नावाची मुलगी जमानत म्हणून झरपला गोताकडे ठेवली. झरपला गोत्राला एका ब्राह्मणाला काही रक्कम देणे होते. त्यावेळी गुजरी व त्या व्यक्तीमध्ये संबंध निर्माण झाले. नंतरच्या काळात त्यांना गोर बंजारा गणात सामावून घेण्यात आले. नसाब वडाच्या झाडाखाली बसल्यामुळे वडतिया हे गोत्र नाव पडले. आजही गोर बंजारा गणात लग्न लावण्याचा मान फक्त वडतिया गोताला आहे.
१. घुगलोत २. धारावत ३. लोकावत
४. नुणावत/लुणावत ५. तेजावत ६. बरमावत
७. चंगावत ८. बांडावत ९. तिलावत
१०. माळोत ११. बोडा १२. जाळोत
१३. कुणसोत. १४. हरकावत १५. हालावत
१६. जेट..जटोत १७. भरोत १८. पाड्या
१९. अजमेरा २०. पोरिका २१. हाजावत
२२. पीतावत २३. साळावत २४. कुणसी/ कसणावत
२५. कुपावत २६. बामणावत २७. दासावत
२८. भगवानदास २९. मालावत/ माकलोत ३०. थेरावत
३१. जोधावत ३२. मकवान ३३. टोपावत
३४. तुवर ३५. पाड्या ३६. मोवनदास
३७. हालावत ३८.घागावत ३९. सेजावत
४०. पेमावत ४१. नेतावत ४२. डुंगरोत
४३. मेराजोत/ मेरावत ४४. गोराम ४५. पुसनामल
४६. गुजरोत ४७. लोलावत ४८. हाणावत
४९. रतणावत. ५०. खिमावत. ५१. पदमावत
५२. सोमावत
५) बाणोत .. (आडे)
जोतपुरच्या भुकीया ( राठोड) गोत्रातून बाणोत ( आडे) या गोत्राची निर्मिती झाली. जोतपुरच्या भुकीयाला सहा मुले झाली. त्यापासून सहा गोत्र.. गोत तयार झालें.
१. आलन २. बालण ३. मव्हन ४. मुचाळ ५. धरमसी ६. जाटोत ७. गोळ... यापैकी गोळ वेगळा झाल्यावर मव्हन व मुचाळचे गोत एक झाले. त्यात नंतर मुणावत आणि बाणोत येवून मिळाले. यांचा वेगळा गोत्र तयार झाला. यालाच नानकी ( लहान) वा चीना राठोडी असेही म्हणतात.
१. बाला
२. मुछाळ
३. मुरहावत
४. धरमसोत
५. जाटोत
६. आलोद
७. बाणोत
साधारणपणे बाणोतचे मुख्य सात पाडे गणल्या जातात. काही साहित्यिक व जाणकारांच्या मते खालील प्रमाणे पाडे सांगितले जातात.
१. जाटोत २. आडोत. ३. लाओरी
४. धोरावत ५. मुणोत ६. कुन्तावत
७. बांडावत ८. भोजावत ९. धरमसोत
१०. मुना ११. कानावत १२. करनावत
१३. पानावत १४. धानावत १५. सपावत १६. सब्दासोत
६) तुरी
तंवरगढच्या तुरी गोत्राला तुरी वा तंवर असे म्हणतात. याचे चार(४)पाडे येतात. गोर बंजारा गणातील राधादादी नावाच्या महिलेने तंवरगढच्या राजपुत्राला आपल्या गणात सामावून घेतले. त्यापासून पुढे तुरी, तंवर गोत्र गोर बंजारा गणात रुढ झाली. अशी एक लोकवंदता आहे.
१. जेसावत
२. राजवान..राजावत
३. तेगावत
४. बिजोद
वरील प्रमाणे गोर बंजारा गणातील गोत्र.. गोत आणि पाडा आहेत. काही भागात नावाच्या उच्चारणात स्थानिक भाषेच्या प्रभावाने थोडाफार फरक संभवतो. गोर बंजारा गण आपल्या गोत्रातील व्यक्तीला " भाईगोत" तर इतर गोत्रातील व्यक्तीला " सगा, सगासेण" असे संबोधन वापरतो. .
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
खुप छान
उत्तर द्याहटवासुपर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा