पोस्ट्स

गोर बंजारा समाज उत्पत्ती आणि इतिहास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोरबंजारा गोरबोली भाषा वैशिष्ट्ये #Gorbanjara_gorboli_language_features

इमेज
  गोर बंजारा गोरबोली आणि भाषा वैशिष्ट्ये            संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली " सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली " आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकांशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही.            गोरबोली उत्पत्तीविषयी विचार            " गोर " या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु  " गोरमाटी "  या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" .   प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची ग...

गोर , गोरमाटी आणि गोरबोली #Gor, #Gormati #Gorboli

इमेज
  गोर बंजारा गोरबोली आणि भाषा सौंदर्य           संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली " सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली " आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकाशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही.            " गोर " या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु  " गोरमाटी "  या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" .  प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची गोरगणाची जीवनप्रणाली आहे. गोरैया (House Sparrow) या पक्षाकडून गोरगणाने सहचर जीवना...

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

इमेज
  बंजारानामा   नज़ीर अकबराबादी   टुक हिर्सो-हवा को छोड़ मियां, मत देस-बिदेस फिरे मारा क़ज़्ज़ाक अजल का लूटे है दिन-रात बजाकर नक़्क़ारा क्या बधिया, भैंसा, बैल, शुतुर क्या गौनें पल्ला सर भारा क्या गेहूं, चावल, मोठ, मटर, क्या आग, धुआं और अंगारा सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा ॥1॥ ग़र तू है लक्खी बंजारा और खेप भी तेरी भारी है ऐ ग़ाफ़िल तुझसे भी चढ़ता इक और बड़ा ब्योपारी है क्या शक्कर, मिसरी, क़ंद, गरी क्या सांभर मीठा-खारी है क्या दाख़, मुनक़्क़ा, सोंठ, मिरच क्या केसर, लौंग, सुपारी है सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा॥2॥ तू बधिया लादे बैल भरे जो पूरब पच्छिम जावेगा या सूद बढ़ाकर लावेगा या टोटा घाटा पावेगा क़ज़्ज़ाक़ अजल का रस्ते में जब भाला मार गिरावेगा धन-दौलत नाती-पोता क्या इक कुनबा काम न आवेगा सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा॥3॥ हर मंजिल में अब साथ तेरे यह जितना डेरा डंडा है। ज़र दाम दिरम का भांडा है, बन्दूक सिपर और खाँड़ा है। जब नायक तन का निकल गया, जो मुल्कों मुल्कों हांडा है। फिर हांडा है न भांडा है, न हलवा है न मांडा है। सब ठाठ पड़ा रह जावेगा, ...

गोरबंजारा बोलीभाषा "गोरबोली" #Gor #Banjara #Language #GORBOLI

इमेज
  गोर बंजारा बोलीभाषा गोरबोली        जगातील वेगवेगळ्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. भाषा वैज्ञानिकांच्या मते ही संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यातील काही भाषांना प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे वैभवाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तर काही भाषा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. वैश्विक, जागतिकीकरणाच्या गर्दीत मुळ बोलीभाषेचा गळा घोटून टाकला आहे. भारतात बाविस (२२) भाषांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. १२२ भाषा प्रचलित आहेत. तर मातृभाषेची संख्या पंधराशेच्या वर आहे. लहानलहान समुहाच्या, समाजाच्या बोलीभाषा अस्तित्व हरवून बसल्या आहेत. काही विचारवंत, साहित्यिक या मुळ बोलीभाषा वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे " बोलीभाषा " लोप पावत आहे. बोलीभाषा जतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धोरण वा योजनेची अंमलबजावणी शासन करताना दिसत नाही.        अनेक बोलीभाषा काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. अशा स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेली एक बोलीभाषा म्हणजेच गोरबंजारा समाजाची बोलीभाषा " गोरबोली " होय.  ...

गोर बंजारा गोरबोलीचा सामान्य परिचय #Gor #Banjara #Language #GORBOLI

इमेज
गोर बंजारा समाज गोरबोली भाषेचा सामान्य परिचय         समुहामध्ये राहताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हावभाव वा कंठातून निघणाऱ्या विविध प्रकारच्या ध्वनीतून भाषेची निर्मिती झाली. "ठराविक क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनीसमुहाला शब्द असे म्हणतात."    "शब्द म्हणजे एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो".   प्रत्येक समुहाने संवाद उपयुक्त अशा ध्वनीला अर्थरुप प्रदान केले. यातून विविध शब्द रचनेची निर्मिती झाली. भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुन नव्हे तर सर्वसामान्य लोकांकडुनच केली जाते. भारतात अनेक जनजाती वास्तव्यास आहेत. या जनजातीत अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात.             भारतातील प्राचीन जनजातींमधील " गोरबंजारा " ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील सर्व प्रांतात जवळपास पन्नास नाव -उपनावाने गोरबंजारा समाज ओळखल्या जातो. ज्यांची लोकसंख्या देशात जवळपास बारा कोटी पेक्षा जास्त आहे . भारत देशातील गोर बंजारा असा समाज आहे ज्यांची बोली, वेशभू...

गोर बंजारा तांडा संघटन " जांगड भेळेर रित" #Gor_Banjara_Tanda_system " #Jangad_Bheler"

इमेज
  गोर बंजारा तांडा संघटन जांगड भेळेर रित ...........   ( तांड्यात सामावून घेण्याची पद्धत)            गोर बंजारा " धाटी " परंपरेनुसार चालणारा समुह. आपल्या धाटीनियमाचे, वहिवाटाचे पालन करणे यातच " तांडा " आनंद मानतो. तांड्याचं जगणं, वागणं, राहणं हे त्याच्या रुढीला अनुसरूनच असते. जगातील कोणत्याही प्रकारच्या बदलत्या रिवाजाशी त्याला देणंघेणं नाही. आपले विचार, कृती कोणत्याही व्यक्ती वा समुहावर लादण्याचा त्याने कधी प्रयत्नही केला नाही. कोणत्या व्यक्ती, समुहाला आपल्या " धाटी " नियम अनुसरण करण्याचा आग्रह केला नाही. बैलाच्या पाठीवर मालाची ने-आण करणे, हेच काम आनंदाने करत आला. " लदेणी " चे काम करताना वाटेत वाटसरूना मार्गदर्शन करण्याचे कार्य करत आला.  तांड्यासोबत चालणारा वाटसरू राजा आहे की रंक, दोस्त आहे की दुश्मन, गरिब आहे का श्रीमंत याचा कधी विचार केला नाही. सोबत येणारे वाटसरू आपल्या गंतव्य स्थानावर पोहचल्यावर तांडा सोडून निघून जात. सोबत येणाऱ्या विषयी सुख नाही तर जाणाऱ्या बाबत दु:ख न बाळगणारा तांडा.          गोर बंजारा गणासोब...

गोर बंजारा तांडा संघटन ' ढालीया, धाडी, नावी ' Gor #Banjara Tanda system ' DHALIYA, DHADI, NAVI '

इमेज
  गोर बंजारा तांडा संघटन   ढालीया, धाडी, नावी          तांड्यामध्ये " नायक" व त्यांच्या पंचमंडळाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी एक छोटासा गणाचा गट कार्यरत असतो. यात " ढालीया, धाडी व नावी (न्हावी) "  यांचा समावेश होतो. निरोप पोचविणे, निरोप आणणे, मंगल कार्यात वा दुःखद प्रसंगात विविध लहानसहान कामे करणे. विविध प्रसंगी ( डफडा) वाद्य वाजविणे. स्तुतीपर कवनाचे गायन करणे. अशी वेगवेगळी कामे हा समुदाय पार पाडत असतो. तांड्यात लहानमोठा असा भेदभाव न बाळगता हा समुदाय सर्वांच्या उपयोगी पडतो. तांडाही या समुदायाच्या उदरभरणाची पुर्ण जबाबदारी उचलतो. अनादी काळापासून हा गणसमाजाचा अविभाज्य भाग बनला आहे.     ढालीया    नायकाचा प्रत्येक काम ऐकणारा व बिनदिक्कतपणे कार्य पार पाडणारा दुय्यम दर्जाचा सहकारी " ढालीया " होय. तांड्याच्या सेवेत दिवसरात्र तत्पर असणारा कार्यकर्ता. प्रामुख्याने नायकाच्या अधीन असणारा. तांड्यात होळी, दवाळी, तीज, विवाह, साडी, गोळ, सगाई, मरणधरण अशा आवश्यक प्रसंगी वाद्य " डफडा " वाजविणे. नायकांचे निरोप घरोघरी देणे, आसामीच्...

गोर बंजारा तांडा संघटन " हासाबी, नसाबी, डायसाणं" Gor Banjara Tanda system "HASABI, NASABI, DAYSANN"

इमेज
  गोर बंजारा तांडा संघटन  हासाबी, नसाबी, डायसाणं         " तांडा " पंचमंडळामध्ये ' नायक, कारभारी ' सोबत महत्वाची भुमिका बजावणारे सदस्य म्हणजेच हासाबी, नसाबी, डायसाणे होत. या पाच लोकांच्या समुहाला " पंच "म्हणतात.कोणत्याही प्रसंगी निर्णय घेताना नायक या लोकांच्या सल्यानेच निर्णायाप्रत पोहचत असतो. एखाद्या बिकट प्रसंग, वादविवाद वा नवरा बायकोतील वाद ' मामलो ' जर नायकाच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आला तर अशा वेळी नायक बैठकीचे आयोजन करतो. याला " नसाब " असे म्हणतात. यावेळी तांड्यातील समजदार, न्यायप्रिय नसाबी व्यक्तीला पंचमंडळामध्ये स्थान मिळते. तांड्यातील वयोवृद्ध जाणकार व्यक्ती ज्यांना अनेक गोष्टींचा अनुभव आहे अशा डायसाण व्यक्तीला नायक पंचमंडळामध्ये घेतो. निष्पक्ष निर्णय व्हावा हा मुख्य उद्देश. अशा निवाड्याच्या वेळी रक्त संबंध तथा अर्थ संबंधीत व्यक्तीला पंचमंडळामध्ये घेण्याचे नायक टाळत असतो.         हासाबी         तांड्याच्या आर्थिक व्यवहार देखरेख करण्यासाठी " हासाबी " ची निवड करण्यात येते. सामान्यतः नायकाच्या मर्जीतील व...

गोर बंजारा तांडा संघटन " कारभारी" Gor Banjara Tanda system " KARBHARI"

इमेज
गोर बंजारा तांडा संघटन  कारभारी                 " कारभारी " नायकाला तांडा कार्यात मदत करणारी प्रमुख व्यक्‍ती म्हणजे कारभारी असतो. नायकाच्या निर्णयाची पाठराखण व अंमलबजावणी करणे ही त्याची कर्तव्ये होय. आदर्श कारभारी आदर्श नायकाइतका सन्मान्य गणला जाऊ शकतो. " कारभारी " हा नायकाच्या अनुपस्थितीत तांडा व्यवस्था सांभाळण्याचे कार्य करीत असतो. कारभारीचे वर्तन, व्यवहार यामुळे तांड्यातील प्रभावी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होते. काही तांड्यात तर कारभारी आपल्या दैनंदिन जीवनातील वागणूकीमुळे नायकापेक्षा सरस ठरतो. तांड्यातील सर्व बाबींचे नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने " कारभारी " च करत असतो. नायकाने घेतलेला निर्णय कार्यान्वित करण्यासाठी कारभारी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. सामान्यतः नायकाने म्हणजेच पंचमंडळाच्या निर्णायाची अवहेलना " तांडा " सहसा करीत नाही.  कारभारी निवड           " कारभारी " हे पद तांड्यामध्ये नायकाप्रमाणेच वंशपरंपरागत नेमल्या जाते. कारभारीचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांपैकी सर्वात वडील मुलगा...

गोर बंजारा तांडा संघटन " नायक " #GorBanjara'sTandasystem " #NAYAK "

इमेज
        गोर बंजारा तांडा संघटन          " नायक "        गोर बंजारा गणाच्या समाज व्यवस्थेतील तांड्याचा प्रमुख प्रशासक, न्यायदाता व मार्गदर्शक " नायक " हा होय. " नायक " हा शब्द अनेक भाषेत वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. परंतु तांडा " नायक " या नावाला आदराने पाहतो. तांड्याची मान मर्यादा, प्रतिष्ठा नायकाच्या नावाशी जुळलेली असते. तांड्यातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी नायकाची असते.   तांड्यातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या कार्यात नायकाची भूमिका महत्वपूर्ण ठरत असते. याच कारणामुळे कदाचित " तांडा " नायकाच्या नावानेच ओळखला जातो. सोमला नायकेर तांडो, आतमा नायकेर तांडो. नायकाच्या तांडा व्यवस्थापनावरच  तांड्याला इतर तांड्यात मानाचे स्थान मिळत असते. विशिष्ट पुजा प्रसंगी नायकाला तांड्याकडून मानाचा " घुंडीवाळो हाडका " दिला जातो.        " नायक " पदाचे महत्त्व       ज्या तांडा समूहात एकापेक्षा अधिक नायकांचे तांडे असतात त्यांच्या संयुक्‍त बैठकीत प्र...

गोर बंजारा समाजव्यवस्था " तांडा" Gor Banjara Social system ' TANDA'

इमेज
  गोर बंजारा समाजव्यवस्था   " तांडा "            गोर बंजारा गणसमाज अनंत काळापासून आपल्या रुढी, परंपरा, रितीरिवाज जपत आला आहे. हजारो वर्षांपासूनच्या परंपरा टिकून राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गोर गणाचे " तांडा " संघटन होय. " तांडा" गाव वस्तीच्या बाहेर, सतत भटकंती करणारा. बैलाच्या पाठीवर, बैलगाडीतून मालाची ने-आण करणे हा पारंपरिक व्यवसाय. जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून जगाला जगणं आणि जगण्याची पद्धत शिकविणे. मालाच्या या वाहतूकीला तांडा " लदेणी " असे म्हणतो. आणि माल उचल करण्याच्या या प्रक्रियेला " खेप वटाणो " असे गोरबोली सांगतो. " तांडा " ज्यांच्या जीवनाचा भाग त्याला " गोर " तर इतर समाजातील लोकांना " कोर " म्हणून संबोधतो. " म गोरमाटी " अशी अख्या जगासमोर ओळख देणारा गोर बंजारा गण. पण याच गोर बंजारा गणाला जगाने हजारो नाव बहाल केलीत. कुणी बंणजारा, बंजारी, कुणी लमाण, लम्बाडा, तर कुणी सुगाली , शिंगाडीया असे एक ना अनेक नावे दिलेली आहेत. परंतु गोर बंजारा गणाला त्याच काही सोयरसुतक नव्हतंच. गोर बंजारा समाजाने य...

गोर बंजारा समाज पुजाविधान.. ५. धबुकार #Gor #Banjara's #worship method '#DHABUKAR'

इमेज
गोर बंजारा समाज पुजाविधान ...५ धबुकार   गोर बंजारा गणात देवीदेवता व पुर्वजांच्या पुजा पद्धती अग्नीत हवी देवून करतात. यात " भोग "  व " धबुकार " असे दोन प्रकार पडतात. " भोग " मातृदेवता व सतगुरू सेवालाल, लिंगायत सामी, श्री बालाजी यादेवतांना अग्निमध्ये ( निखाऱ्यावर) द्यावयाच्या हवीला म्हणतात. पुर्वजांच्या नावाने व होळी, दिवाळीच्या नावाने दिल्या जाणाऱ्या अग्नीतील ( निखाऱ्यावर) हवीला " धबुकार " असे म्हणतात. धबूकार साठी जे प्राचीन नैवेद्य सांगितलेले आहे त्यात कडाई, लापसी व वळकट (शेवया) असे पदार्थ विशेष येतात. रव्यासारखे जाड कणिक उकळत्या गोड पाण्यात घोटीत शिजवले की ‘ कडाई ’ हा पदार्थ तयार होतो.  लापसी व शेवया (वळवट) हे पदार्थ विशेष सार्वत्रिकच आहेत.       धबुकार पुजा पद्धती प्रकार पहिला        नैवेद्याचे पदार्थ तयार झाले की पूजेचे ताट तयार करतात. ताटात बनविलेला पदार्थ टाकले की पूजेचे ताट तयार झाले. हल्‍ली अगरबत्ती पेटवून घेतात. तांब्याभरून (लोटा) पाणी घेतात. पूजेचे ताट चुलीसमोर ठेवतात. पाण्याचे भांडे पूजा करणार्‍यांच्या डाव्या बाजूला ठेवाय...

गोर बंजारा समाज पुजाविधान.४.. गोटपुजा #Gor #Banjara's #worship method ' #GOTPUJA '

इमेज
  गोर बंजारा समाज पुजाविधान..४   गोटपुजा         ‘ गोट ’ म्हणजे मृत पूर्वजांची सबली पूजा. याची पद्धती देखिल ‘पूजा’ पद्धतीची असून यातही ‘चोको पुरण्यात’ काढण्यात येतो. फक्‍त ‘ विन्ती ’ पूर्वजांच्या नावाने म्हणावयाची असते. ‘ गोट ’ फक्‍त पूजकांचे आई-वडील किंवा त्याच्या वडील किंवा वडिलांचे आईवडील (आजोबा आजी) पैतृक एवढ्याच लोकांची करतात. सामान्यतः गोर गणात पुर्वजाना दिवाळी व होळी या सणाच्या दूसऱ्या दिवसी त्यांच्या नावाने  " धबुकार " देत असतात. याकरिता शेव, खिर, लापसी यासारख्या आदिम काळापासून प्रचलित असलेले पदार्थ बनवितात. परिवारात काही शुभ प्रसंग असेल वा परिवारावरील एखादे अरिष्ट टळले असेल अशा वेळी साधारणपणे " गोटपुजा " करतात. येथे हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे की पारधी, बेलदार, घिसडी, मसणजोगी अशा अनेक आदिम जमातीत ‘ गोट ’ प्रचलित आहे. गोट करणार्‍यासर्वच जाती-जमातीशी गोर बंजारा गणाचा पूर्वानुबंध आहे यावर सखोल, निष्पक्ष आणि चिकित्सक अभ्यास व्हावा . ज्यामुळे या जमाती आणि त्यांचे पृथ्वीतलावरील प्राचीन पाऊलखुणाचा काळ माहीत होईल. गोटपुजा पद्धती     ...