गोरबंजारा बोलीभाषा "गोरबोली" #Gor #Banjara #Language #GORBOLI
गोर बंजारा बोलीभाषा
गोरबोली
जगातील वेगवेगळ्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. भाषा वैज्ञानिकांच्या मते ही संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यातील काही भाषांना प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे वैभवाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तर काही भाषा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. वैश्विक, जागतिकीकरणाच्या गर्दीत मुळ बोलीभाषेचा गळा घोटून टाकला आहे. भारतात बाविस (२२) भाषांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. १२२ भाषा प्रचलित आहेत. तर मातृभाषेची संख्या पंधराशेच्या वर आहे. लहानलहान समुहाच्या, समाजाच्या बोलीभाषा अस्तित्व हरवून बसल्या आहेत. काही विचारवंत, साहित्यिक या मुळ बोलीभाषा वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे " बोलीभाषा" लोप पावत आहे. बोलीभाषा जतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धोरण वा योजनेची अंमलबजावणी शासन करताना दिसत नाही.
अनेक बोलीभाषा काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. अशा स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेली एक बोलीभाषा म्हणजेच गोरबंजारा समाजाची बोलीभाषा " गोरबोली" होय.
" गोरबोली" म्हणजेच गोर, गोरमाटी, लमाण, लंबाडी, लमाणी,नायक, बंजारा या गोरगण समाजाची भाषा. भारतातील सर्व राज्यातील गोरमाटी समाज आपल्या 'गोरबोली 'भाषेतच आजही संवाद साधतो. गोरबोलीत मुळ ध्वनीसमुहाचा जास्त वापर होतो. त्यामुळे गोर बोली भाषा संस्कृत, हिंदी, मराठी या भाषेपेक्षाही प्राचीन भाषा ठरते. भाषा मानवाच्या कंठातून निघणाऱ्या विविध स्वरांचा समुह. विशिष्ट ध्वनीला " वर्ण" असे संबोधतात. वर्णाच्या समुहापासून शब्द रचना तयार होते. इतर भाषेमध्ये मुलध्वनी ला अर्थ नसून ध्वनीसमुहाला अर्थ प्राप्त होतो., परंतु गोरबोलीत अनेक मुलध्वनीच विशिष्ट अर्थपूर्ण आहेत. याच कारणामुळे" गोरबोली" प्राचीनत्वाचे सर्व निकष पूर्ण करते.
मराठी वर्णमालेतील वर्णाचा विचार केला तर असे अनेक वर्ण अर्थपूर्ण रित्या " गोरबोली" त वापरले जातात. खालील वर्ण व वर्ण उच्चारावरून " गोरबोली" भाषेच्या समृद्धतेचा वारसा लक्षात येईल.
अ - काय ? , कोणी आवाज दिला तर उत्तर "अ "असं देतात.
- अ, आवाज देणे.
आ - ये, बोलावणे. एवडी आ. इकडे ये.
इ, ई - हा, हि, हे . इ मार घर छ. हे माझे घर आहे.
- वस्तू वा व्यक्ती निर्देश
उ - तो, ती. ते. उ तोंन मालम छ काई, ते तुला माहित आहे का?
ऊ. - तो, ती . ऊ जनाच चलोगो, तो तर तेव्हाच गेला.
- वस्तू - व्यक्ती निर्देश
ए - अहो. ए सामळी क? ए ऐकलंस का?
ऐ - हे. अनेक वचन साठी वापरतात, ऐ कुण छ? हे कोण आहेत?
ओ - ते, त्या. ओ कुण छ? ते कोण आहेत?
औ - येवू. म औ. मी येवू?
अं - प्रश्न. ?????? पुन्हा विचारणा,
अं - अचानक विचारलेल्या प्रश्नाला प्रतिक्रीया
क - बोल, सांग.
का - का? काऊंन? कारण
कि - सांगितले, म्हटले,
कु - सांगू? कु काइ! सांगु काय?
कू - कसा, कशाप्रकारे. कु काई? कसे काय?
के - सांगितले, ओ के. त्यांने सांगितले.
कै - खूप, कैक , कित्येक
को - माहिती नाही. माहीत नसणे.
को - सांगितले, म्हटले. कुण को? कोणी सांगितले.
खो - खा , खाणे. तु खो. तु खा.
खौ - खावू का?
गी - गेली.(स्त्रीलिंगी, एकवचनी भुतकाळ) कत गी? कुठे गेली?
गे - गेले ( अनेक वचन) कत गे? कुठे गेले.
गो - गेला, जाणे ( पुलिंगी एकवचनी ) कत गो? कुठे गेला?
चा - चाल ,चल
छ - आहे. तार नाम काई छ? तुझे नाव काय आहे?
छा. - आहोत. हाम भाई छा? आम्ही भाऊ आहोत.
छी - आहे ( द्वितीय पुरुषी) तु कुण छी. तु कोण आहेस.
छू - आहे ( प्रथम पुरुषी) म छू. मी आहे
छो. - अंक सहा(६)
छो - आहात. तम भाई छो. तुम्ही भाऊ आहात.
तो - तर. न गो तो ! नाही गेलो तर !
धू - धूर
धो - धुणे, हातपग धो. हातपाय धू.
द - दे, देणे. मन पाणी द. मला पाणी दे.
दा - देणे, देवू. झाडेन पाणी दा. झाडाला पाणी देवू.
दी - संख्या दोन(२)
दु - देवू. म दू काइ? मी देवू का?
दो - द्या. (सामुहिक) मेल दो. ठेवून द्या.
न - नाही. म न जातो. मी नाही जात .
बा - वडील, बाप
म - मी , स्वतः
या - याडी, आई , माता
या - विस्मयकारक शब्द ( स्त्री वाचक)
र - होता, होती, होते. (भूतकाळ ) वोत र. तेथे होता.
रा - होतो. हाम वोत रा. आम्ही तेथे होतो. (थांबणे)
रो - रड, रडणे. रो मत. रडू नको.
रो - होता, होते. कत रो? कुठे होता/होते?
रु - होतो , हजर असणे (प्रथम पुरूषी)
रू - कापूस
ल - घे, इ ल. हे घे.
ला - आन. उ ला. ते आण.
लु - घेवू. म लु . मी घेवू.
लू - पुसणे . मुंडो लू. तोंड पुस.
लो - घ्या. (सामुहिक विनंती)
सी - थंडी लागणे.
से - एकूण एक, सर्व
सो - झोपणे. तु सो. तु झोप
हं - हो, होकार
भाषेचा विकास होत असतांना सुरुवातीला संवाद साधण्यासाठी काना, मात्रा विरहित शब्दाचा उपयोग झाला असेल हे निश्चित आहे. गोर बोली भाषेत फक्त स्वर, आणि मूळअक्षरे (व्यंजन ) यांचा वापर करूनच अर्थपूर्ण शब्द तयार होतात. यात बरेच असे व्यंजन आहेत की त्यांचे अर्थ फक्त गोर बोलीतच आपल्याला मिळू शकते. भारतीय वा इतर विदेशी भाषेचा विचार करता मुलध्वनीचा वापर इतर भाषेपेक्षा " गोरबोलीत" जास्त प्रमाणात होतो. यामुळेच "गोरबोली" ही प्राचीनत्वाच्या निकषांवर पूर्ण उतरते . यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. ज्यामुळे " गोरबोली" ही एक प्राचीन भाषा आहे हे सिद्ध होईल .
✍✍✍✍✍✍
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
संदर्भ:-
@बंजारा समाज गोरबोली आणि मौखिक वाड्मय.. डॉ. सुभाष राठोड
@ गोर स्वाभिमान.......प्रवीण पवार
@ गोरपान.. भिमणीपुत्र मोहन नायक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा