गोर बंजारा समाज गोत्र .... गोत पाडा.. १ Gor Banjara Gotra, Got (pada)
गोर बंजारा समाज.. गोत्र विचार
मानवी समुहात कुटूंब पद्धती जशी विकसित होवू लागली. त्याप्रमाणे समुहाची एकवाक्यता व एकजिनसीपणा टिकवून ठेवण्यासाठी गोत्र संकल्पना रूढ झाली. मानवी समाजाच्या विकासाप्रमाणे गोत्र संघटना उदयास आली. कुटुंब संघटना उदयास आली तेव्हा पुर्णतः मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. गोत्रे ही मातृवंशीय होती.नंतरच्या काळात पितृसत्ताक कुटुंबपद्धती विकसित झाली आणि पितृवंशिय गोत्रे अस्तित्वात आली. असे माॅर्गन या समाजशास्त्रीचे मत आहे.
गोत्र आणि गोत्र प्रतीक (Totem) यांचा अभ्यास करणारे असेही म्हणतात की, ‘मूळपूर्वज काल्पनिक वा सत्य असू शकतो. एवढेच नव्हे तर मूळ पूर्वज मनुष्यच असावयास पाहिजे असेही नाही. निर्जीव पदार्थ, कोणताही प्राणी, वनस्पती देखील मूळपूर्वजपदी स्थापता येऊ शकते.’
गोर बंजारा समाज गोत्र या शब्दाचा पर्यायी शब्द " गोत" . गोत्राच्या वेगवेगळ्या भाग पडतात त्यांना " पाडा" असे म्हणतात. एका गोत्रातील सर्व लोक एकमेकांना " गोत भाई" संबोधतात. तर ईतर गोत्रातील लोकांना " सगासेण" म्हणून संबोधतो. साधारणपणे गोर बंजारा समात एका गोत्रात विवाह संबंध होत नाही. तसेच मृत्यू प्रसंगी एका गोत्रात येणाऱ्या सर्व पाड्यातील लोक सुतक पाळतात.
गोर बंजारा समाजाचे मुख्य असे एकुण सहा गोत्र "गोत" पडतात. याच सहा गोत्रांना आजच्या काळातील ओळख म्हणजे राठोड, चव्हाण, पवार, जाधव, आडे या आडनावाने ओळखल्या जाते. आणि प्रत्येक गोत्रात अनेक उपघटक पडतात.
१) भुकीया :- यालाच राठोड असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण सत्तावीस (२७) पाडे आहेत.
२) झरपला :- यालाच पवार असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण बारा (१२)पाडे आहेत.
३) पालतिया :- यालाच चव्हाण असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण सहा (०६) पाडे आहेत.
४) वडतिया :- यालाच जाधव असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण बावन्न (५२) पाडे आहेत.
५) बाणोत :- यालाच आडे असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण सात(७) पाडे आहेत.
६) तुरी :- यालाच तुरी, तंवर असे आडनाव रूढ झाले असुन यांचे एकुण चार (०४) पाडे आहेत.
गोर बंजारा समाजाच्या गोत्रातील भुकीया, झरपला आणि पालतिया या मुख्य गोत्रातून पुढील काळात बाणोत, वडतिया आणि तुरी गोत्र निर्माण झाली असे आजही जुनी जाणकार मंडळी सांगतात.
गोत्र कुलचिन्ह (Totam) याबाबत काल्पनिक भावनेला जास्त महत्त्व दिसून येते. वडतिया गोतातील लोकांची लग्नासंबंधी न्याय पंचायत वडाच्या झाडाखाली बसली होती. तेव्हापासून वडतिया लोक वडाच्या पानावर जेवण करीत नाही. गोत्र प्रतिकाबाबत झरपला गोताची एक गोष्ट सांगितली जाते. एका विशेष अशा बैठकीच्या वेळी झरपला (पवार) समुहाच्या गणात एक संख्या कमी पडत होती. यावेळी तरोटा (एक रानगवत) याला गणसंख्येसाठी सामावून घेतले. तेव्हापासून झरपला गोतात "पमोडीया" रानगवताची भाजी खात नाही. इतर गोतात कोवळ्या पानांची भाजी आवडीने खातात.
गोर बंजारा गणात सहा मुख्य गोत्रातून अनेक उपघटक पडतात. त्याबाबत अनेक काल्पनिक कथा, लोककथा, गित, काव्य एकायला मिळतात.
किशोर आत्माराम नायक
गोर बंजारा संस्कृती
छान
उत्तर द्याहटवाआई तुळजाभवानी आमची कुलदैवत हरा वत राठोड जय जगदंबा जय सेवालाल जय आई तुळजाभवानी
हटवाजय तळजा जय सेवालाल
उत्तर द्याहटवा