गोर बंजारा संस्कृती Gor Banjara culture"
गोर बंजारा समाज
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3380390655141934"
crossorigin="anonymous"></script>
जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या अनेक देशांमध्ये आज वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातो. विशिष्ट ठिकाणी वास्तव्य न करता जगाच्या कानाकोपऱ्यात फिरून विविध प्रकारच्या वस्तू , पदार्थ, धान्य, दारुगोळा इत्यादी गोष्टींचा पुरवठा समाजातील विविध घटकांना करण्याचे कार्य हा समाज पुरातन काळापासून करत आलेला आहे.
वेगवेगळ्या देशांतील, प्रांतातील लोकांनी आपापल्या परीने त्यांना नावं ठेवलीत. कुणी गोर, कुणी बंजारा, कुणी लमाण, कुणी लभाणा .... भारत देशात जवळपास चाळीस प्रकारच्या नावाने गोर बंजारा समाज ओळखल्या जातो.
जरी लोकांनी भिन्न भिन्न नावे दिली. तरी हा समाज स्वतःला आजतागायत " गोरमाटी" म्हणूनच मानतो आणि तीच ओळख दुसऱ्याला देतो.
गोरमाटी बोलणारा तो " गोर" आणि ईतर भाषिक यांना "कोर" म्हणून संबोधतो. आपण आणि आपला तांडा याच्यातच रमणारा हा गोर बंजारा समाज आज आपली ओळख विसरत चालला आहे.
माझ्या गोर बंजारा समाज आणि संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न...
किशोर आत्माराम नायक
#गोर बंजारा संस्कृती
https://gorbanjarasanskruti.blogspot.com/2023/04/blog-post.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा