गोर बंजारा समाज उत्पत्ती आणि इतिहास..२ Gor Banjara Origin & History
गोर बंजारा ... अर्थ व विचार
गोर बंजारा या शब्दाचा अर्थोत्पत्तीविषयी अनेक विधान केल्या गेले आहेत. त्याचा विचार येथे करणे अप्रस्तुत होणार नाही. "गोर " या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना काही विचारवंत.. गो म्हणजे गाय आणि र.. म्हणजे रक्षण करणारा असा अर्थ घेतात. हा समुह वाणिज्य करू लागले, तेव्हापासून त्यास वाणिज्य करणारे अशा अर्थाचे बणजारा नाव दिले. किंवा या लाकांनी स्वतः घेतले असे म्हणणे चुकीचे होणार नाही. वाणिज्य या संस्कृत शब्दाचा अर्थ बणज व्यापार असा होतो. वनात दडून राहाणार्या भयंकर दरोडेखोरांना व लुटारूंच्या प्रचंड टोळ्यांना जेरीस आणणारे ते बंजारी. वन + ज + अरि अशा तीन शब्दांचा यात समोवश होतो असे काहीचे मत आहे . ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. ‘बंजारा’ हे उत्तरेकडे ‘ब्रिंजारी’ या नावानेही मोडतात. तर कुठे लमाण, लमाणा, लभाण, लम्बाडा, बाळदीया, लदेणीया, गवारीया, कांगसिया, सिंगाडीया यासारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
वनचरपासून बंजारी शब्द झाला, असेही लोक म्हणतात. वनातच सारा जन्म घालवून व्यापारधंदे करू लागल्यामुळे हे नाव पडले. असे त्याचे म्हणणे आहे. शिवाय हा शब्द उर्दु भाषेतून इकडे आला असावा असाही एक तर्क आहे. उर्दुमध्ये बंजारा याचा अर्थ ‘पडीत जमीन’ असा होतो. मराठीतही याच शब्दाचे स्वरूप ‘बंजाड’ असे झालेले आहे. म्हणून पडीत जमिनीवर उपजिविका करणारे लोक असाही याचा अर्थ होईल. बंजार्याचाही पडीत जमिनीशी नेहमीचा व निकट संबंध येत असे.
मिठाचा व्यापार करणारे.. मीठालाच लवण म्हणतात म्हणून लमान. मथुरेच्या भागात वास्तव्यास असलेल्यांना मथुरा लभाण. लदेणी करणारे लदेणीया , बैल बाळगणारे म्हणून बाळदीया, डोक्यावर केसात शिंगासारखा हा अलंकार वापरतात म्हणून शिंगाडीया. अशाप्रकारच्या अनेक नावाने त्याची संस्कृती भिन्न भिन्न प्रांतात ओळखल्या जाते.
अरबी-फारशी भाषेला ‘बंजारा’ या शब्दाचा अभिप्रेत अर्थ ‘गानप्रिय भटक्या’ हा आहे. त्याच्या उपजिविकेचे एकमेव साधन केवळ मालाची ने-आण करणे हे होते. गायी गुरांच्या पाठीवरून मालाची ने आण करणार्या या अवस्थेला ते ‘लदेणी’ असे म्हणत. अशी लदेणी म्हणजे व्यापार नव्हे. ती मालाची ने आण होय.
गोरबंजारा लोक आपल्या सांस्कृतिक एकीकरणास ‘गोरवट’ असे म्हणतात.’ वर दिलेल्या वृत्तीचा बंजारा स्वतःची ओळख ‘म गोर’ (मी गोर) अशी करून देतो. स्वतःला हे लोक गोर म्हणून घेतात. ‘गोर माटी’ म्हणजे बंजारा स्त्री-पुरुष असा बंजारा बोलीतील शब्द आहे. स्वतःच्या बोलीला देखील हे लोक ‘गोर बोली’ ‘गोरू र बोली’ म्हणून संबोधतात. म्हणूनच बंजारा गणाचे खरे नाव ‘गोर बंजारा गण’ हे असावे.
गोर
गोर म्हणजे शासनकर्ते’ असा अरबी भाषेतून आधार सापडतो. तसेच बंजारे लोकांस स्वाभिमान असून ते स्वतःस गोरे म्हणजे श्रेष्ठ किंवा 'गोर' समजतात व इतरास ‘कोर’ म्हणजे कनिष्ठ किंवा काळे म्हणतात.
ॠग्वेदातील आर्यांच्या शत्रूंचे "पणि" हे वर्णन असुन ते बंजारा गणास पुष्कळसे लागू पडतात व बंजारा गणाच्या लोकसाहित्यातही कोणे एकेकाळच्या घनघोर युद्धाची, आपले सर्वस्व गेल्याची, तुटक-विस्मृतप्राय वर्णने येतात. त्याचा काळ हा अर्थातच इतिहास पूर्व कालीन असावा. गोरवट’ किंवा गोरबंजारा लोकगण हा आद्यवासी अनार्यच आहे. हे वेगळे सांगण्याची जरूरी भासणार नाही असे वाटते. काही जमातीतील साम्यावरून हा लोकगण त्यांच्यापासून झाला असा निरर्थक अंदाज करणे चुकीचे वाटते.
काही भागात विशेषतः ‘लव वंशात झाले म्हणून ‘लमाण’ असे या गणाचे नाव पडले असे सांगितले जाते. पण राम आणि रामायण या बाबत या समाजात कोणत्याही प्रकारची पुजाअर्चना वा उपासना केली जात नाही.
' बंजारा’ हा शब्द संस्कृत किंवा संस्कृतच्या कोणत्याही सहभाषेचा आलेला नसून अरबी-फारशी भाषेतून तो आलेला आहे. अर्थात या लोकगणाला ‘बंजारा’ हे विशेषनाम मुस्लिमांनी दिलेले आहे. म्हणूनच या लोकांचा उल्लेख हिंदुस्थानात मुसलमानांनी स्वतंत्र ग्रंथरचना करावयास प्रारंभ केल्यानंतरचा आहे. गोरबंजारा समाजाच्या आपल्या स्वतंत्र अशा चालीरीती, प्रथा , परंपरा आहेत. या रूढीं पाहता हा समाजगण आदिम काळापासून चालत आलेला आहे असे वाटते.
जन्म, विवाह, मृत्यू तसेच विविध जे संस्कार पार पाडले जातात. कोणत्याही इतर समाजाशी मिळतेजुळते आढळून येत नाही. ज्या ज्या भागात या गणसमाजाचा इतर समाजाशी संपर्क आला. त्याठिकाणी लोकांनी आपापल्या परीने त्यांचे नामकरण केले. गोर बंजारा समाज पुर्वी पासुन गाव, नगरापासून अंतर ठेवून जगत आला . त्यामुळे आजपावेतो त्याची संस्कृती टिकून आहे. आजच्या विज्ञान युगात स्वतःची अस्मिता जोपसण्यासाठी हा समाज झगडत आहे. गोरबंजारा गणाची बोली, परंपरा, रुढी, पेहराव इत्यादी बाबी जतन करण्यासाठी अनेक महान व्यक्ती झटत आहेत. लढा देत आहेत.
गोर बंजारा संस्कृती
किशोर आत्माराम नायक
https://gorbanjarasanskruti.blogspot.com/2023/04/blog-post_9.html
छान
उत्तर द्याहटवा