पोस्ट्स

गोर बंजारा विरगाथा #Gor_banjara_legends

इमेज
  गोर बंजारा विरगाथा   श्योपुर का गोर राजा राधिकादास         श्योपुर मध्यप्रदेश कि भूमीपर बसा हुआ, एक छोटा-सा राज्य। जिसकी निव रखी, जयपुर घराने के सामंत गोर इंद्रसिंह ने ई. 1537 में । जो शिव के बहोत बड़े उपासक थे। श्योपुर क़िले का उल्लेख निमात-उल्लाह के ऐतिहासिक अभिलेख में मिलता है।             अंग्रेज ने जैसे ही हिंदूस्थान में प्रवेश किया, सबसे पहले यहां के छोटे-छोटे राजाओं को आपस में लडवाया। और अपनी साम्राज्य कि लालसा को पुरा किया।            श्योपुर राज्य के बारेमे वर्णन " History of Maratha " इस किताब में आता है, जो जे. एस. चौरसिया द्वारा लिखीं गई है। पृष्ठभुमी        18 वी सदी की शुरुआत में श्योपूर पर गोर राजा राधिकादास का अधिपत्य था। इसी काल में दौलतराव सिंधिया ने मध्यभारत कि कमान संभाली। उनके कालमे छोटे-छोटे साम्राज्य को भारी नुक़सान पहुंचा। वजह अंग्रेजोके  नापाक इरादे और सिंधियां में सोच-समझ की कमी। जिसकी वजह से छोटे-छोटे राज्यों पर अंग्रेजों ने अपना वर्चस्व प्रस्थापित किया।             दौलतराव सिंधिया ने ई.1808 मे राधिकादास से आर्थिक दुर्बलता का कारण बताकर 15लाख की म

गोरबंजारा गोरबोली भाषा वैशिष्ट्ये #Gorbanjara_gorboli_language_features

इमेज
  गोर बंजारा गोरबोली आणि भाषा वैशिष्ट्ये            संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली " सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली " आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकांशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही.            गोरबोली उत्पत्तीविषयी विचार            " गोर " या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु  " गोरमाटी "  या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" .   प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची गोरगणाची जीवनप्रणाली आहे. गोरैया (House Sparrow) या पक्षाकडू

गोर , गोरमाटी आणि गोरबोली #Gor, #Gormati #Gorboli

इमेज
  गोर बंजारा गोरबोली आणि भाषा सौंदर्य           संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली " सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली " आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकाशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही.            " गोर " या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु  " गोरमाटी "  या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" .  प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची गोरगणाची जीवनप्रणाली आहे. गोरैया (House Sparrow) या पक्षाकडून गोरगणाने सहचर जीवनाचा वसा उचलला आहे. गोरैया

बंजारानामा..... नजीर अकबराबादी #Banjaranama #Nazir_Akbarabadi

इमेज
  बंजारानामा   नज़ीर अकबराबादी   टुक हिर्सो-हवा को छोड़ मियां, मत देस-बिदेस फिरे मारा क़ज़्ज़ाक अजल का लूटे है दिन-रात बजाकर नक़्क़ारा क्या बधिया, भैंसा, बैल, शुतुर क्या गौनें पल्ला सर भारा क्या गेहूं, चावल, मोठ, मटर, क्या आग, धुआं और अंगारा सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा ॥1॥ ग़र तू है लक्खी बंजारा और खेप भी तेरी भारी है ऐ ग़ाफ़िल तुझसे भी चढ़ता इक और बड़ा ब्योपारी है क्या शक्कर, मिसरी, क़ंद, गरी क्या सांभर मीठा-खारी है क्या दाख़, मुनक़्क़ा, सोंठ, मिरच क्या केसर, लौंग, सुपारी है सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा॥2॥ तू बधिया लादे बैल भरे जो पूरब पच्छिम जावेगा या सूद बढ़ाकर लावेगा या टोटा घाटा पावेगा क़ज़्ज़ाक़ अजल का रस्ते में जब भाला मार गिरावेगा धन-दौलत नाती-पोता क्या इक कुनबा काम न आवेगा सब ठाठ पड़ा रह जावेगा जब लाद चलेगा बंजारा॥3॥ हर मंजिल में अब साथ तेरे यह जितना डेरा डंडा है। ज़र दाम दिरम का भांडा है, बन्दूक सिपर और खाँड़ा है। जब नायक तन का निकल गया, जो मुल्कों मुल्कों हांडा है। फिर हांडा है न भांडा है, न हलवा है न मांडा है। सब ठाठ पड़ा रह जावेगा, जब लाद चलेगा ब

गोरबंजारा बोलीभाषा "गोरबोली" #Gor #Banjara #Language #GORBOLI

इमेज
  गोर बंजारा बोलीभाषा गोरबोली        जगातील वेगवेगळ्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. भाषा वैज्ञानिकांच्या मते ही संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यातील काही भाषांना प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे वैभवाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तर काही भाषा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. वैश्विक, जागतिकीकरणाच्या गर्दीत मुळ बोलीभाषेचा गळा घोटून टाकला आहे. भारतात बाविस (२२) भाषांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. १२२ भाषा प्रचलित आहेत. तर मातृभाषेची संख्या पंधराशेच्या वर आहे. लहानलहान समुहाच्या, समाजाच्या बोलीभाषा अस्तित्व हरवून बसल्या आहेत. काही विचारवंत, साहित्यिक या मुळ बोलीभाषा वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे " बोलीभाषा " लोप पावत आहे. बोलीभाषा जतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धोरण वा योजनेची अंमलबजावणी शासन करताना दिसत नाही.        अनेक बोलीभाषा काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. अशा स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेली एक बोलीभाषा म्हणजेच गोरबंजारा समाजाची बोलीभाषा " गोरबोली " होय.          " गोरबोली "

गोर बंजारा गोरबोलीचा सामान्य परिचय #Gor #Banjara #Language #GORBOLI

इमेज
गोर बंजारा समाज गोरबोली भाषेचा सामान्य परिचय         समुहामध्ये राहताना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हावभाव वा कंठातून निघणाऱ्या विविध प्रकारच्या ध्वनीतून भाषेची निर्मिती झाली. "ठराविक क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण ध्वनीसमुहाला शब्द असे म्हणतात."    "शब्द म्हणजे एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो".   प्रत्येक समुहाने संवाद उपयुक्त अशा ध्वनीला अर्थरुप प्रदान केले. यातून विविध शब्द रचनेची निर्मिती झाली. भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुन नव्हे तर सर्वसामान्य लोकांकडुनच केली जाते. भारतात अनेक जनजाती वास्तव्यास आहेत. या जनजातीत अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात.             भारतातील प्राचीन जनजातींमधील " गोरबंजारा " ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील सर्व प्रांतात जवळपास पन्नास नाव -उपनावाने गोरबंजारा समाज ओळखल्या जातो. ज्यांची लोकसंख्या देशात जवळपास बारा कोटी पेक्षा जास्त आहे . भारत देशातील गोर बंजारा असा समाज आहे ज्यांची बोली, वेशभूषा, गोत्र, राहणीमान हे एकसारखेच आहे. गो

गोरबोली कविता " प्रेमज्योती" लखनकुमार जाधव #Gorboli Poem " PREMJYOTI" Lakhankumar Jadhao

इमेज
गोरबोली कविता    प्रेमज्योती ...... (कविता) ..............लखनकुमार जाधव   तू नानकीया, म मोटो वाते बना कामेरी | वडन मातेप बेसजाय देकलं धूड पगे हेटेरी  || रीस तो आंगार छ वोम मत बळेस | रीसागे जेन मीटो बोलन मानतो वीय तो मनालेस || झाड कनायी वेटेनी नाम वीचारन फूल | हाम पणन सदरे कोनी करा पगे पगेम भूल || धर्म नाळी भाषा नाळी तो बी हामेम एकी छ  | नाळी नाळी रंग छ तरी बेकी छेनी, नेकी छ || जो रचं  खरो प्रेमेती वोन तो  प्रेमज मळचं | प्रेम नगदी व्यवहार छ जू भेळीया जू भळचं  || सारी वातेम भगवान नाने मोटेम वसरोचं | मनकीया का खोटी नाटी वाते मायी फसरोचं || वाते ती वाते बडचं शांत स्वभावेती रेणू | रीसेती वाढं रीस प्रेमेती प्रेम देणू || घणो आचो वाटं जना  दीवे ती दीवो  बळचं | एक दीवेर वजाळो जना   दूसरेर आंधारेन  मळचं  || ©️®️ लखनकुमार मा. जाधव मु. दुधागिरी तांडा ता. पुसद जि. यवतमाळ मो. 9763437420 ***** **** माहिती संकलन:-       किशोर आत्माराम नाईक       गोर बंजारा संस्कृती .                               

गोर बंजारा तांडा संघटन " जांगड भेळेर रित" #Gor_Banjara_Tanda_system " #Jangad_Bheler"

इमेज
  गोर बंजारा तांडा संघटन जांगड भेळेर रित ...........   ( तांड्यात सामावून घेण्याची पद्धत)            गोर बंजारा " धाटी " परंपरेनुसार चालणारा समुह. आपल्या धाटीनियमाचे, वहिवाटाचे पालन करणे यातच " तांडा " आनंद मानतो. तांड्याचं जगणं, वागणं, राहणं हे त्याच्या रुढीला अनुसरूनच असते. जगातील कोणत्याही प्रकारच्या बदलत्या रिवाजाशी त्याला देणंघेणं नाही. आपले विचार, कृती कोणत्याही व्यक्ती वा समुहावर लादण्याचा त्याने कधी प्रयत्नही केला नाही. कोणत्या व्यक्ती, समुहाला आपल्या " धाटी " नियम अनुसरण करण्याचा आग्रह केला नाही. बैलाच्या पाठीवर मालाची ने-आण करणे, हेच काम आनंदाने करत आला. " लदेणी " चे काम करताना वाटेत वाटसरूना मार्गदर्शन करण्याचे कार्य करत आला.  तांड्यासोबत चालणारा वाटसरू राजा आहे की रंक, दोस्त आहे की दुश्मन, गरिब आहे का श्रीमंत याचा कधी विचार केला नाही. सोबत येणारे वाटसरू आपल्या गंतव्य स्थानावर पोहचल्यावर तांडा सोडून निघून जात. सोबत येणाऱ्या विषयी सुख नाही तर जाणाऱ्या बाबत दु:ख न बाळगणारा तांडा.          गोर बंजारा गणासोबत भ्रमण करणारा प्रवासी, वाट ह

गोर बंजारा साहित्य " गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन.. भिमणीपुत्र मोहन नायक #Gor _Banjara _Book " #Gormati_Bolibhasheche Samajik Avishkar &Lokjivan.. Bhimniputra Mohan Nayak

इमेज
गोर बंजारा साहित्य  गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन    ......................... भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक                  गोरमाटी बोलीभाषेला ‌राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून गोरगणातील अनेक विचारवंत, साहित्यिक अहोरात्र मेहनत घेत आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, साहित्य मंडळ यांच्यासोबत पत्रव्यवहार करून " गोरबोली " ला राजभाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.          मानवाच्या विकास अवस्थेत एकमेकांशी संप्रेषण करताना विविध स्वर, आवाज हेच प्रमुख साधन होते. जसजशी मानव विकास अवस्थेत पोहचला. तसा त्याने स्वत:ला स्वनिम रुप प्रदान केले. त्यामधून अनेकविध भाषांचा जन्म झाला. रानटी अवस्थेतून आलेली स्वर संकेताची भाषा नागरी अवस्थेत संस्कारीत होवून सभ्य भाषा बनली. राजकीय, सामाजिक संरक्षण लाभल्याने नागरी भाषा विकसीत पावली. परंतु बोलीभाषा हळूहळू ऱ्हास होत गेली. जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या अनेक मुळ बोली भाषा लिपीबद्ध न झाल्याने संपुष्टात आल्यात. बोलीभाषा दैनंदिन भाषा व्यवहारात वापरताना मागासपणाचे लक्षण समजून आपल्याच लोकांनी आपली बोली नेस्तनाब

गोर बंजारा साहित्य " घुगरी घालेरो" .. राहुल सिंधू पालतिया #Gor_Banjara_book "#Ghugri_Ghalero"

इमेज
  गोर बंजारा साहित्य घुगरी घालेरो लेखक:- राहुल सिंधु पालतिया पो. नि. यवतमाळ..8888092427. प्रस्तावना.  मा.भिमणी पुत्र मोहन नाईक आंतरराष्ट्रीय गोर लेखक, साहित्यिक समीक्षा.✍ याडीकार पुसद......... 9421774372         राहुल सिंधु पालतिया पोलीस निरीक्षक मु.पो.जिवती जिल्हा चंद्रपुर ह.मु.यवतमाळ लिखित...✍घुगरी घालेरो. ई पुस्तक गोरबनजारा समाजेमाई रंडीरंडायी बाईन देवरेती घुगरी घालन न्याय देरेर जगेमाईर ई गौरवशालीप्रथा. चकेन अभिमान वाटेवाळी प्रथा,रूढीर आधारेप लकोलकाय पुस्तक छं . सदर पुस्तकेन मा.आंतरराष्ट्रीय गोर लेखक भिमणीपुत्र मोहन नाईक साहेबेर प्रस्तावनाती ये पुस्तके र महत्त्व बढगोछं. ये पुस्तके र आंग राहुल 11 मे 2018 म " तांडो " नामेरो कविता संग्रह काढो. वु भी खुब गाजमेलो छं . पोलीस दलेम नौकरी करेवाळे मनक्यान बाटी खायेन फुरसत रेयेणी तरी राहुल नौकरी संमाळन तांडो कवीता संग्रह लखन थांबेणी.  तो ऊ जगेमाईर गोरूर नारीन न्याय देवाळ घुगरी घालेर प्रथाप एक जिवती गामेकनेर नागपूर तांडेमाईर  22 वरसेर रंडीरंडायी छोरीसंगीतार एक दर्दभरी😢😢😢😢 कहाणी ये पुस्तके मांडन तमाम गोर गणेमाई विचारेर पेरणी करछं.