गोर , गोरमाटी आणि गोरबोली #Gor, #Gormati #Gorboli
गोर बंजारा गोरबोली आणि भाषा सौंदर्य संस्कृती आणि भाषा हे मानवी समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग असल्याचे मानल्या जाते. संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी भाषा उपयोगी ठरते. इतिहास आणि संस्कृती यांचा वारसा प्रत्येक समाज आपल्या बोलीभाषेत दर्शवित असतो. " गोरबोली " सुद्धा याला अपवाद नाही. भाषा सौंदर्य आणि व्याकरण दृष्टीने स्वयंसिद्ध अशी गोरबंजारा गणाची " गोरबोली " आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सिंधू संस्कृती कालीन अनेक घटकाशी गोरबंजारा संस्कृती व बोलीभाषेत साधर्म्य आढळून येते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही त्यावर संशोधन झाले नाही. " गोर " या शब्दाची उत्पत्ती चा प्रवास अनेक साहित्यिक गो म्हणजे गाय आणि र म्हणजे रक्षण असा घेतात. परंतु " गोरमाटी " या शब्दाच्या उत्पत्तीला भौगोलिक संदर्भ आहे. गोर प्रांतात, प्रदेशात वास्तव्य करीत असलेला तो " गोर + माटी (माणूस)" . प्रकृतीच्या नैसर्गिक घटनांचे अवलोकन करून त्याचे अनुकरण करण्याची गोरगणाची जीवनप्रणाली आहे. गोरैया (House Sparrow) या पक्षाकडून गोरगणाने सहचर जीवनाचा वसा उचलला आहे. गोरैया