गोर बंजारा साहित्य " ताण्डा".. आत्माराम कनिराम Gor Banjara Book 'TANDA'.. Atmaram Kaniram
गोर बंजारा साहित्य ताण्डा.... आत्मचरित्र लेखक :- आत्माराम कनिराम राठोड ताण्डा.... वाचावा तर का?? (वाचक मत) आत्माराम कनिराम तांड्याच्या अंगाखांद्यावर वाढून दलित चळवळीच्या मार्गाने येशूच्या कुशीत विसावलेल झुंजार वादळ यांचं आत्मचरित्र म्हणूनच नव्हे तर सिंधू संस्कृतीच्या गत वैभवशाली परंपरेपासून स्वातंत्र्योत्तर तांड्याच्या नशिबी आलेल्या वैधव्याची जाणिव करुन घेण्यासाठी.................... घर, परिवार, मित्र, तांडा, समाज , संस्कृती, प्रथा-परंपरा, नेते, शासन, त्याची धोरणे या साऱ्या पसाऱ्याचा विरोध करत स्वतः विरुद्ध ही विद्रोह करुन उठणारा हा अवलिया .... ......... आत्माराम कनिराम लेखक आत्माराम कनिराम यांनी लहानपणापासून ताण्डा अनुभवला, शिकला आणि जगलाही.. त्याची व्यथा पानापानांत वाचायला मिळते. तांड्यात बापाची व्याख्या करताना म्हणतो.. अडाणी असो वा उच्च विद्याविभूषित असो तांड्यातल्या कौटुंबिक मर्यादेत बापाचा शब्द बापाचाच असतो. बालपणात देवादिकांची लागलेली ओढ त्यात " माई " चा मोठा हातभार. त्यातूनच साकारलेल प्रसिद्ध ओवीबद्ध ग्रंथ " श्